नांदेड, दि. 15: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या
वर्धापनदिनानिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत
महापौर अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.15) ध्वजारोहण
झाले.
कार्यक्रमास आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार अमर राजूरकर,
उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, स्थायी समिती सभापती उमेश
पवळे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, सभागृह नेते स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण
महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फ़ातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, गटनेत्या
डॉ. शीला कदम, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, विद्या गायकवाड, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, नगरसेवक
सर्वश्री किशोर भवरे, दिलीप कंदकुर्ते, शफ़ी अहेमद कुरेशी, बालासाहेब देशमुख, प्रमोद
उर्फ़ बंडू खेडकर, ऍड. श्याम बन, स. गुरमितसिंघ उर्फ़ डिंपल नवाब, फ़ारुख हुसेन,
संजय मोरे, शंकर गाडगे, सोनाबाई मोकले, गंगाबाई कदम, डॉ. करुणा जमदाडे, डॉ. ललिता
बोकारे-शिंदे, रजिया बेगम यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका, माजी सभापती विनय
सगर, अमितसिंह तेहरा, दत्ता कोकाटे, पांडुरंग काकडे, व्यंकटेश जिंदम, संदीप
गायकवाड, अ. गफ़ार अ. सत्तार, दर्शन राजूरकर, केशव मोकले, महापालिकेचे सर्व सहाय्यक
आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, विविध विभागप्रमुख, कर्मचारी इतर नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
महापालिकेचे पोलिस पथकप्रमुख श्री. भराडे यांच्या
नेतृत्वाखाली पोलिस पथकाने मानवंदना दिली. ध्वजवंदन कार्यक्रमानंतर समिती सभागृहात
झालेल्या चहापान कार्यक्रमात महापौर अब्दुल सत्तार, आमदार अमर राजूरकर, उपमहापौर
आनंद चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त
सर्वांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment