नांदेड, दि. 3: महापालिकेचे अप्पर आयुक्त म्हणून डॉ. निशिकांत देशपांडे यांनी आज गुरुवारी (दि.3) दुपारी रा. ल. गगराणी यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. देशपांडे हे यापूर्वी नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील श्री. गगराणी हे गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत अप्पर आयुक्त म्हणून काम पाहत होते. डॉ. देशपांडे यांची प्रतिनियुक्तीद्वारे या पदावर बदली केल्यानंतर गगराणी यांना त्यांच्या महसूल व वन खात्यात रुजू होण्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले होते. नवे अप्पर आयुक्त डॉ. देशपांडे यांचा उपायुक्त (महसूल) राजेंद्र खंदारे व इतर अधिका-यांनी स्वागत करुन अडीच वर्षात महापालिकेमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल गगराणी यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment