इतवारा
हद्दीत हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी विशेष पथक
नांदेड, दि.16: रमजान महिन्यात इतवारा भागात साहित्य खरेदीसाठी होणारी
मोठी गर्दी लक्षात घेता पोलिस अधिका-यांच्या विनंतीवरुन महापालिकेने त्या भागातील
हातगाड्यांना शिस्त लावण्यासाठी दोन विशेष संयुक्त पथकाची स्थापना केली आहे.
हबीब टॉकीज- बर्की चौक - मन्नीयार गल्ली-देगलूर
नाका या परिसरात हातगाडेचालक रस्त्यावर उभे राहून वाहतूक व पादचारी मार्गावर अडथळा
निर्माण करीत असतात. त्याकरिता वाहतूक व रहदारी व्यवस्थेत पोलिसांच्या मदतीसाठी मन्नीयार गल्ली
हबीब टॉकीजचौकासाठी झोन क्रमांक 3 चे नगर निरिक्षक मिलिंद पेकमवार आणि देगलूर नाका
परिसरासाठी इमारत निरिक्षक अशपाक अली खान यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दहा
जणांचे संयुक्त विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक दि. 14 ते 30 जुलै 2014
या कालावधीत दुपारी 2 ते रात्री 10 दरम्यान संबधित परिसरात कार्यरत राहणार असून
इतवाराचे सहायक पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. सदर
पथकावर झोन क्र. 3 (इतवारा) चे सहायक आयुक्त यांचे नियंत्रण राहील.
No comments:
Post a Comment