नांदेड,
दि.18: ज्येष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
पुण्यतिथीनिमित्त विद्युत भवन शेजारच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती
पुतळ्यास शुक्रवारी (दि.18) महापालिकेतर्फे उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, स्थायी
समिती सभापती उमेश पवळे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, डॉ. विद्या गायकवाड, नगरसेवक
नवल पोकर्णा, डॉ. विश्वास कदम, माजी प्रभाग सभापती महेश कनकदंडे, व्यंकटेश जिंदम, कार्यकारी
अभियंता सुग्रीव अंधारे, शिक्षणाधिकारी भागवत जोशी, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, शिवाजी
डहाळे, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, प्रकाश कांबळे, पुतळा संरक्षण समितीचे भारत
खडसे, जी. नागय्या आदी उपस्थित होते. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले.
No comments:
Post a Comment