आजारांच्या लक्षणाआधीच करा प्रतिबंधात्मक उपाययोजना
नांदेड, दि.17: पावसाळ्याच्या
दिवसात आरोग्याची रोगांचा प्रतिकार करण्याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेशी काळजी
घेणे आवश्यक असून पाण्याच्या साठ्वणुकीपासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी डेंगू, चिकनगुनिया, हिवताप व इतर आजाराची लक्षणे दिसण्याआधीच प्रतिबंधात्मक
उपाययोजना करावी, असे आवाहन
महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात घर,
परिसरात तसेच रिकामी
भांडी, टिनचे डबे, टायर अथवा अन्य वस्तूत पावसाचे पाणी साठू देऊ
नका. घरातील पाण्याचे साठे, रांजण, माठ, पीप, अथवा पाण्याची टाकी यावर झाकण घट्ट
ठेवावे. घराभोवती खड्डे, डबकी
असल्यास मुरूम किंवा भर टाकून भरून घ्यावे. नाले, गटारे साफ करून सांडपाणी वाहते
ठेवावे.
साठवण साधने दर आठवड्यास
धुवा
जनावरांसाठी अथवा कपडे धुण्यासाठीचे पाण्याचे हौद, टाक्या किंवा पाणी साठवण क्षमतेची अन्य साधने दर आठवड्यास स्वच्छ धुवून, पुसून कोरडी करावी. कुलर, फुलदाणी, पाण्याची कारंजी, यातील पाणी दर आठवड्यास काढून टाकावे.
झोपताना घ्या ही काळजी
डासांच्या सवयी लक्षात घेता सायंकाळच्या वेळी घराची दारे
खिडक्या बंद करून घ्यावे. खिडक्यांना जाळीदार पडदे लाऊन घेणे. झोपताना उघड्या अंगाने झोपू नका. विशेषतः लहान बाळाची काळजी घ्या. शक्य झाल्यास मच्छरदानी, डास प्रतिबंधक मलम, धुरी अथवा अगबत्तीचा वापर करावा.
लक्षणे दिसताच डॉक्टरला तात्काळ
भेटा
ताप आलेल्या व्यक्तीची डॉक्टरकडून तात्काळ तपासणी करुन घ्यावी. ही सुविधा सरकारी दवाखाने व मनपा दवाखान्यात उपलब्ध आहे. मनपा आरोग्य सेवेतील
कर्मचारी व त्यांचे मदतनीस आणि जनतेचा सहभाग यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण हिवताप, डेंगू व चिकुनगुनिया या आजाराला मुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.
हिवतापाची लक्षणे
१. या आजारात थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते.
२. ताप एकदिवसा आड किंवा दोन दिवसाआड येतो.
३. आजारात सर्व अंग दुखते, डोखे दुखते, पांघरुन घ्यावेसे वाटते. त्यानंतर घाम येउन ताप कमी होतो. आणि रुग्णास थकवा येतो.
४. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार अत्यंत आवश्यक आहे. उपचार न केल्यास वारंवार ताप
येतो. प्रसंगी रुग्ण बेशुद्धदेखील होऊ शकतो.
डेंगूची लक्षणे
१. या आजारात दोन ते सात दिवस तीव्र ताप असतो.
२. तीव्र डोके दुखी, स्नायू दुखी व सांधे दुखी.
३. उलट्या होणे.
४. डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे.
५. अंगावर पुरळ, त्वचेखाली नाक तोंड मधून
रक्त स्राव.
६. अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे.
चिकुनगुनियाची लक्षणे
१. या आजारात कमीत कमी मुदतीचा तीव्र ताप.
२. डोकेदुखी, अंगदुखी व तीव्र सांधे दुखी.
३. तीव्र सांधेदुखीमुळे माणूस वाकून जातो.
४. काही रुग्णाच्या अंगावर पुरळ आढळून येतात.
५. 15 ते 20 टक्के रुग्णामध्ये सांधे दुखी, 10 दिवस ते तीन महिन्यापर्यंत राहते.
No comments:
Post a Comment